Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला, आज ११ वाजता होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी?

दि . 16/06/2019

बहुप्रतीक्षित असणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाला अखेर मुहूर्त मिळाला असून आज सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार, अशी चर्चा सुरू आहे.  मंत्रिमंडळ विस्तारात कोणकोणत्या नव्या मंत्र्यांची वर्णी लागणार? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊ शकतात.

राज्यात सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय. हे अधिवेशन सुरू होण्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार उरकण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा सुरू आहे. १४ जून रोजी होणारा मंत्रिमंडळ विस्ताराचा प्लान बारगळला होता. आता मात्र, आज हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं आता निश्चित मानलं जातं आहे.


ताज्या बातम्या