Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आदित्य ठाकरे राज्याचं नेतृत्व करण्यास सक्षम : संजय राऊत

दि . 15/06/2019

शिवसेना पक्षप्रमुख ‘उद्धव ठाकरे’ पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला उद्धव ठाकरे 16 जून रोजी भेट देणार आहेत. याच पार्श्ववभूमीवर शिवसेचे खासदार ‘संजय राऊत’ यांनी आज पत्रकार परिषेदेचे आयोजन केले होते. दरम्यान, यावेळी राऊत यांनी पत्रकारांशी अनेक मुद्यांवर चर्चा केली. युवासेना प्रमुख ‘आदित्य ठाकरे’ यांनी देखील पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती.

आदित्य ठाकरे हे राज्याचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम असल्याचं देखील संजय राऊत यांनी यावेळी म्हंटल आहे. पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी असं म्हटलं आहे. ‘शिवसेनेचे एक नेते असल्याच्या दृष्टीकोनातून आदित्य ठाकरे यांनी आपली कामं सुरू केली असून त्यांच्यात राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे’. असं यावेळे संजय राऊत म्हणाले.

 


ताज्या बातम्या