Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कानफटावर पिस्तुल ठेवून लूट प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात मालेगाव पोलीस अपयशीच..

दि . 15/06/2019

मालेगाव: शुक्रवारी नाशिक शहरातील मुथ्थुट फायनान्सच्या कार्यालयात दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडेखोरांनी दहशत माजवत लूट करून एका तरुण कर्मचाऱ्याचा गोळी घालून खून केला. या घटनेने संपूर्ण नाशिक शहरात भीती आणि खळबळ उडवून दिली आहे.
अशीच घटना मालेगाव शहरात मुस्लिम बांधवांचा रमजान महिन्याच्या एक आठवडा अगोदर ताशकंद पार्क भागात दिवसाढवळ्या अश्रफ हकीम यांच्या घरात शसस्र दरोडेखोरांनी कानफटावर पिस्तुल ठेवून मोठी आर्थिक लूट करून पलायन केले होते. यावेळी अश्रफ यांच्या डोक्यावर पुस्तूलाचा वार करून जखमी केलं होतं.शहर पोलिसात गुन्हा दाखल होऊन महिन्याच्या वरती कालावधी लोटला तरी या लूट प्रकरणातील आरोपींचा शहर पोलिसांना अध्याप शोध घेता आलेला नाही त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण असून,पोलीस आरोपींपर्यंत पोहचत नसल्यामुळे आरोपींच यामुळे मनोबल वाढून अश्याच प्रकारे आणखी गंभीर गुन्हा हे आरोपी करू शकतात, त्यामुळे पुन्हा एखाद गुन्हा होण्यागोदर पोलिसांनी यातील गुन्हेगारांचा शोध घेऊन जेरबंद करण्याची मागणी होत आहे.


ताज्या बातम्या