Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावातील स्मार्ट किड्स अँबकस अकॅडमीच्या विध्यार्थ्यांचे विभागीय पातळीवर यश;आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड....

दि . 13/06/2019

मालेगाव: मालेगाव सारख्या ग्रामीण भागातून नावलौकिक मिळवत देशपातळीवर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी  स्मार्ट किड्स अँबकस अकॅडमीच्या पूर्वा दादाजी शेवाळे,यशस्वी नंदाळे ,युक्ती शर्मा ,हर्ष देसले ,रामकृष्ण नंदाळे व मयुरी पगार या विद्यार्थ्यांची निवड झाल्याने आपला वेगळा ठसा उमटवून मालेगावचे नांव हे विद्यार्थी देश पातळी वर गाजवतील असा आत्मविश्वास अकॅडमीच्या संचालिका अंजली आहेर यांना आहे.

जळगाव येथे पार पडलेल्या ज्ञानवेध अबँकस विभागीय स्पर्धा -2019 स्पर्धेत स्मार्ट किड्स अँबकस अकॅडमीच्या विध्यार्थ्यांना उत्कृष्ट यश मिळाले आहे. यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिसे येथील विद्यार्थ्यांनी घेऊन मालेगावचे नांव देशपातळी गाजवीले आहे.

विद्यार्थींच्या ह्या यशा बद्दल स्मार्ट किड्स अँबकस अकॅडमीच्या  संचालिका अंजली आहेर मँडम तसेच पालक आणि मालेगावकारांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात...


ताज्या बातम्या