Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात २९ पासून एकाच छताखाली शिक्षण व्यवसाय मार्गदर्शन..

दि . 12/06/2019

मालेगाव शहर तालुक्यातील विद्यार्थी व पालकांसाठी येथील आयएमए हाॅलमध्ये २९ जूनपासून दाेन दिवसीय शिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयाेजन केले आहे. यात तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने व चर्चासत्रे हाेणार आहेत. हा उपक्रम सर्वांसाठी खुला व माेफत आहे, अशी माहिती राेटरी क्लब ऑफ मालेगाव फाेर्टचे संस्थापक अॅड. शिशिर हिरे व अध्यक्ष वीजेंद्र शर्मा यांनी दिली. 
शहरात दर्जेदार व्यवसाय शिक्षण देणाऱ्या संस्था व करिअर मार्गदर्शन क्लासेस आहेत. मात्र यांची आेळखच स्थानिक विद्यार्थी व पालकांना नसल्याने त्यांचा ओढा पुणे व नाशिककडे असताे. अनेक विद्यार्थ्यांना शहरापासून दूर शिक्षण आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे असे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संधींना मुकतात. यावर पर्याय स्थानिक विद्यार्थी व पालकांसाठी राेटरी क्लब  ऑफ   मालेगाव फाेर्ट, हिंदुस्थान कॉम्प्युटर्स करिअर गाइडन्स, मन्सुरा इंजिनिअरिंग व मेडिकल काॅलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण अभ्यासक्रम व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर घेण्यात येत आहे. विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नितीन ठाकरे, दिलीप ठाकरे, सर्जेराव पवार, किशाेरभाई कुटमुटिया, देवेंद्र काेटावते, देवेंद्र अलई, अॅड. नीलेश पाटील आदींनी केले आहे. 
यांचे मार्गदर्शन 
व्यावसायिक केतन दस्तानी, संजय िहरे, संजय फतनानी, अर्पिता लाड, प्रा. वर्षा वाघ, प्रा. सरिता गव्हाणे, टाटा माेटर्स फायनान्सचे लिगल उपाध्यक्ष प्रशांत भारती, अॅड. रमेश डुबे स्वयंराेजगाराविषयी मार्गदर्शन करणार आहेत. 
यासाठी मार्गदर्शन 
स्किल डेव्हलपमेंट, लघुउद्याेग, कुकिंग, केटरिंग, हाॅटेल मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, फार्मसी, संगणक, ब्यूटिपार्लर, फळबाग शेती व शेतीपूरक व्यवसाय, फॅशन, पाेलीस भरती, विमा, बँकिंग आदींसह इतरही व्यवसाय व अभ्यासक्रमांची माहिती येथे उपलब्ध हाेणार आहे.


ताज्या बातम्या