Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
ओबीसी समाजाला शैक्षणिक सवलती देण्याची मागणी

दि . 12/06/2019

 देशभरात ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंगसाठी शिष्यवृत्ती लागू करून शैक्षणिक सुविधा देण्याची मागणी करण्यात आली. काॅंग्रेसच्या ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष मयूर वांद्रे यांनी मागण्यांचे निवेदन शासनाला सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दर दहा वर्षांनी ओबीसी समाजाची गणना हाेते. मात्र, ती जाहीर केली जात नाही. देशभरात ओबीसी समाज ५२ टक्के आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कुठलेही प्रयत्न हाेत नाही. त्यामुळे या समाजासाठी शैक्षणिक सुविधेसह विशेष याेजना राबविणे गरजेचे आहे. भटक्या जाती-जमातीची नाॅन क्रीमीलेयर अट रद्द करावी, सायन्स व टेक्नाॅलाॅजी क्षेत्रात आरक्षण मिळावे, सरळ सेवा भरतीसाठी लागू पाच वर्षाची अट शिथिल करावी, ओबीसी महामंडळातून कर्ज देण्यात यावे, कर्मचारी व अधिकाऱ्यांना बढतीत जागा राखीव ठेवाव्यात ओबीसी समाजाला शैक्षणिक सवलती देण्याची मागणी


ताज्या बातम्या