Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
बँक खातेधारकांना मिळणार या सवलती..

दि . 11/06/2019

⚡ भारतीय रिझर्व्ह बँकेने किमान खातेधारकांच्या सोयीसाठी लागू केली नवी नियमावली.

1 जुलैपासून खातेधारकांना चेकबूकसह अन्य काही सोयी मोफत मिळणार आहे. यासह खातेधारकांना किमान शिल्लक रक्क्म ठेवण्याची सक्तीही बँका करू शकणार नाहीत. 

😍 *खातेधारकांना मिळणार या सुविधा* : 

▪ *डिपॉझिट्स* : खातेधारकांना खात्यात रक्कम जमा करण्याची सोय संबंधित बँकेच्या कोणत्याही शाखेतून उपलब्ध होणार आहे. याशिवाय एटीएम आणि मशिनद्वारे रक्कम जमा करण्यासाठीही सुविधा उपलब्ध आहे.

▪ *ई-डिपॉझिट्स* : खातेधारकांना चेक, इलेक्ट्रॉनिक्स सेवा, केंद्रीय आणि राज्य स्तरीय एजन्सीच्या माध्यमाद्वारे रक्कम जमा करण्याची सुविधा आहे.

▪ *डिपॉझिट्स मर्यादा* : खातेधारकांना त्यांच्या मूलभूत बचत बँक ठेव खात्यात महिन्यातून तीनवेळा रक्कम जमा करण्याची सुविधा आहे. याशिवाय रक्कमेवर कोणतिही मर्यादा नाही.

▪ *एटीएम* : सर्व खातेधारकांसाठी एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड देणे अनिवार्य आहे.मूलभूत बचत बँक ठेव खाते धारकांना चार वेळा खात्यातून रक्कम काढण्याची सोय उपलब्ध आहे. 

▪ *चेकबुक* : मूलभूत बचत बँक ठेव खाते धारकांना कोणत्याही शुल्काविना चेकबुक वितरीत करावे लागू शकते. त्यासाठी ग्राहकांना कोणत्याही किमान शुल्काची आवश्यकता भासणार नाही.

 


ताज्या बातम्या