Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




दुष्काळी परिस्थितीला कंटाळून टिंगरी येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या...

दि . 11/06/2019

तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती कायम असताना टिंगरी येथील एका तरुण शेतक-याने  रात्री आपली जीवनयात्रा संपली.

 भटू निंबा पवार या तरुण शेतक-याने आपल्या घराजवळ असलेल्या शेतात विषप्राशन करून आत्महत्या केली.

 यंदाची दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी व कर्जबाजारीपणा या नैराश्येतून पवार यांनी आत्महत्येचे पाउल उचल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 

त्यांच्या नावे बँकेचे ७ लाखाचे कर्ज आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. जिल्हाधिकारी यांना प्राथमिक अहवाल पाठविण्यात आला असून वडनेर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुण शेतक-याच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे.


ताज्या बातम्या