Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
एमबीएच्या प्रवेशप्रक्रियेस सुरवात..

दि . 11/06/2019

मालेगाव : कॅम्पातील गोळीबार मैदान येथील डॉ. बी. व्ही. हिरे महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० करीता एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुभाष जे. जाधव यांनी ही माहिती दिली.
विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता प्रवेशप्रक्रियेसाठी महाविद्यालयात शासनमान्य सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून हे केंद्र नियमित वेळेसह सुटीच्या दिवशीदेखील सुरू राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना एमबीए, तसेच इतर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यावयाचा असेल त्यानी महाविद्यालयात येऊन ऑनलाईन अर्ज भरून नोंदणीसाठी संपर्क करावा. सुविधा केंद्रावर ( SSK ) अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुविधा केंद्रावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून पडताळणी करणे गरजेचे आहे. तसेच प्रवेशासंबंधी व इतर माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन कक्षदेखील सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी डॉ. बी. व्ही. हिरे एमबीए-एमसीए महाविद्यालय, गोळीबार मैदान, मालेगाव कॅम्प येथे संपर्क साधावा, असे आवाहन समन्वयक प्रा. डॉ. कामरान रहेमानी यांनी केले आहे.


ताज्या बातम्या