Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावी २५ कामांसाठी पाच कोटींचा निधी...

दि . 09/06/2019

मालेगाव - येथील महापालिका क्षेत्रातील विविध मुलभूत सोई सुविधांच्या विकासकामांसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून ५ कोटीचा निधीस मंजुरी मिळाली आहे. या निधीतून शहरात २५ कामे होणार असून लवकरच या कामांचा प्रारंभ होणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. 
यावेळी ना. भुसे यांच्यासह स्थायी समिती सभापती जयराज बच्छाव, शिवसेना गटनेते नगरसेवक निलेश आहेर, राजाराम जाधव, राजेश गंगावणे, मनोहर बच्छाव, डॉ. यतीन कापडणीस, भरतदेवरे, संजय धिवरे आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ना. दादा भुसे यांनी सांगितले की, राज्यातील महापालिकांना मुलभूत सोयी सुविधानाच्या विकासासाठी अनुदान देण्यात येते. त्याअंतर्गत शहरासाठी ५ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुल येथे जॉगिंग ट्रक, विद्युत खांब, साउंड सिस्टीम, बेंच तसेच कॉलेज रोड- एकात्मता चौक-कॅम्प रोड लगत जॉगिंग ट्रक, मोसमपूल शाळा येथे अभ्यासिका व शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे  बसवणे अशा प्रमुख कामांचा समावेश आहे. यासह सभामंडप, भुयारी गटार, चौक सुशोभिकरण आदी कामे देखील यात केली जाणार आहेत. या कामांना मंजुरी दिल्याबद्दल ना. भुसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील आभार मानले. मालेगावच्या उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी येत्या १४ जून रोजी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे १४ जून रोजी मालेगावी येणार असल्याची माहिती ना. भुसे यांनी यावेळी दिली. यावेळी देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सटाणा रोडवरील यशश्री कंपाऊड येथे दुपारी २ वा. उद्योजक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या विविध उद्योग विषयक योजनांची माहिती यावेळी दिली जाईल. या परिषदेसाठी मालेगावसह जिल्हा व राज्यभरातील उद्योजकांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच उद्योगमंत्री देसाई यांच्या हस्ते सायने व रावळगाव अजंग एमआयडीसीच्या भूखंड नोंदणीचा शुभारंभ केला जाणार आहे. या कार्यक्रमास उद्योजकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ना. भुसे यांनी केले.


ताज्या बातम्या