Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दहावीचा निकाल जाहीर : यंदाही मुलींचीच सरशी

दि . 08/06/2019

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 82.82 टक्के लागला आहे.

यंदा राज्याचा निकाल ७७.१० टक्के लागला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल १२.२१  टक्क्याने घटला. तर मुलांचा निकाल 72.18 % लागला. पुणे विभाग ८२. ४८ टक्के, नागपूर विभाग ६७.२७ टक्के, औरंगाबाद विभाग ७५.२० टक्के, मुंबई विभाग ७७.०४ टक्के, कोल्हापूर विभाग ८६.५८ टक्के, अमरावती विभाग ७१.९८ टक्के, नाशिक विभाग ७७.५८ टक्के, लातूर विभाग ७२.८७ टक्के, कोकण विभाग ८८.३८ टक्के लागला आहे.

 

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे :
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com


“एसएमएस’ सेवेद्वारे निकाल पाहण्यासाठी : 
bsnl मोबाइलमधून MHSSC 57766 या क्रमांकावर पाठवा.


ताज्या बातम्या