Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
रमजान ईद आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वृक्ष वाटप...

दि . 05/06/2019

मालेगाव : जागतिक पर्यावरण दिन निमित्त रमजान ईदचे औचित्य साधून ईदगाह मैदान येथे ईद नमाज पठण करून येणाऱ्या मुस्लिम बांधवांना वृक्ष रोप वाटप उपविभागीय वन अधिकारी जगदीश येडलावर, वन परिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

         मालेगाव वन विभाग व मालेगावकर विधायक संघर्ष समिती, मालेगाव ग्रीन ड्राइव्ह, मालेगाव युवा संघटना, लायन्स क्लब, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप, यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी निखिल पवार, देवा पाटील, कुंदन चव्हाण, अजय मंडवेवाला, यशवंत खैरनार, यु आर पाटील, कलीम अब्दुल्ला, अविनाश निकम, राहुल देवरे, गितेश बाविस्कर, सतीश कलंत्री, विवेक वारुळे, सुशांत कुलकर्णी, गणेश जंगम, गणी शाह, योगेश निकम, वनविभागाचे लेखापाल योगेश अभंग, वनरक्षक आर व्ही देवरे, सी जी पाटील, दिपक हिरे, अनिल ठाकरे, एकनाथ जाधव आदी उपस्थित होते.


ताज्या बातम्या