Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दाभाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत खातेदारांच्या खात्यातील लाखो रुपये परस्पर काढल्याची घटना...

दि . 04/06/2019

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत खातेदारांच्या खात्यातील लाखो रुपये परस्पर काढल्याची घटना...
-संशयित गणेश सोनवणे ताब्यात..
-खातेदारांमध्ये घबराट.

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या खातेदारांच्या खात्यावरून परस्पर रक्कम काढून तब्बल लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची घटना काल सायंकाळी उघड झाली. 
बँकेच्या कर्मचाऱ्याकडून हा प्रकार झाल्याचा संशय.या प्रकरणी चौकशी करण्‍यात येणार असून खात्यावर परस्पर रक्कम गायब कशी गायब झाली. यावर आज पुणे येथी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी नंतर उघड होईल.हा प्रकार उघड झाल्यानंतर
खातेदारांनी बँकेत गर्दी केली होती.गणेश सोनवणे याने रक्‍कम काढण्याचे कबूल केले आहे. बँक प्रशासनातर्फे त्याची चौकशी आहे या प्रकारांमुळे परिसरातील शेतकरी खातेदारांमध्ये घबराट पसरली आहे. पंचक्रोशीतील एकमेव राष्ट्रीयकृत बँक असल्याने जास्तीत जास्त खातेदार ही शेतकरीच आहेत. गणेश मधुकर सोनवणे या कंत्राटी कर्मचाऱ्यानी रक्कम काढून घेत असल्याचे गंभीर प्रकार यावेळी उघड झाले.गणेश सोनवणे हा बँक मित्र असून त्याला एव्हड्या मोठ्या रकमेची फेरफार करता येत नसून या मध्ये अजुन कुणी सहभागी आहेत का हे आज त्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतरच येईल.

प्राथमिक अंदाजानुसार सुमारे साठ लाखापेक्षा जास्त रक्कम काढल्याची चर्चा आहे.या वरिष्ठ अधिकारी चौकशी करत आहेत चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे बँकेचे व्यवस्थापक यांनी सांगितले दरम्यान शेतकरी मजूर, निराधार खातेदारांची रक्कम गायब झाल्याने अनेकांची व अश्रू अनावर झाले. कष्टाच्या कमाईचा विश्वासघात झाल्याची प्रतिक्रिया खातेदारांकडून व्यक्त होत आहे. बँकेच्या वरिष्ठांनी चौकशी करुन खातेदारांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
एकंदरीत आज बँकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर च किती रक्कम खातेदारांच्या खात्यातून गायब झाली आहे ते कळणार आहे..


ताज्या बातम्या