Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




⭕मुंबई - राज्यातील ११ आपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या तर त्यापैकी ७ जणांना डीआयजी पदी बढती.. 

दि . 24/05/2019

राज्य गृह विभागाने आज (शुक्रवारी) काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये 7 वरिष्ठ पोलिस अधिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांना पोलिस उप महानिरीक्षक / अप्पर पोलिस आयुक्‍त पदी बढती देण्यात आली आहे.पदोन्‍नतीने बदली झालेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढीलप्रमाणे
अनिल कुंभारे (पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ-8, बृहन्मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्‍त, ठाणे शहर – पदोन्‍नतीने), ज्ञानेश्‍वर सदाशिव चव्हाण (पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ-2, बृहन्मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्‍त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई – पदोन्‍नतीने), दिलीप आर. सावंत (पोलिस उपायुक्‍त, गुन्हे प्रकटीकरण शाखा, बृहन्मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्‍त, उत्‍तर विभाग, बृहन्मुंबई – पदोन्‍नतीने), एस.एच. महावरकर (पोलिस उपायुक्‍त, मुख्यालय, सोलापूर शहर ते अप्पर पोलिस आयुक्‍त, उत्‍तर विभाग, नागपूर शहर – पदोन्‍नतीने), एस.डी. येनपुरे (पोलिस उपायुक्‍त, एल.ए. 4, मरोळ, मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्‍त, पश्‍चिम विभाग, ठाणे शहर – पदोन्‍नतीने), नवीनचंद्र दत्‍ता रेड्डी (पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ – 10, बृहन्मुंबई ते पोलिस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल, पुणे – सध्याचे पद उन्‍नत करून – पदोन्‍नतीने) आणि रामनाथ लक्ष्मणराव पोकळे (उपायुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड – पदोन्‍नतीने).
बदल्या झालेल्या पोलिस उप महानिरीक्षक / अप्पर पोलिस आयुक्‍तांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे
महादेव बी. तांबडे (पोलिस आयुक्‍त, सोलापूर शहर ते पोलिस उप महानिरीक्षक, गडचिरोली – नागपूर कॅम्प), सत्यनारायण (अप्पर पोलिस आयुक्‍त, पश्‍चिम विभाग, ठाणे शहर ते पोलिस उप महानिरीक्षक, व्ही.आय.पी. सुरक्षा, मुंबई – पद अवनत करून), अंकुश आर. शिंदे (पोलिस महानिरीक्षक, गडचिरोली – नागपूर कॅम्प ते पोलिस आयुक्‍त, सोलापूर शहर) आणि श्रीकांत तरवडे (पोलिस उपमहानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती ते अप्पर पोलिस आयुक्‍त, दक्षिण विभाग, पुणे शहर)


ताज्या बातम्या