Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावी आठवडाभरात बलात्काराच्या तीन घटनांनी मालेगाव हादरले...

दि . 22/05/2019

मालेगाव : शहरात गेल्या आठवड्याभरात बलात्काराच्या तीन घटना घडल्या असून यामध्ये एका नऊ वर्षीय बालिकेवर शेजारी राहणाऱ्या इसमाने गैरकृत्य केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एका महिलेवर दोन संशयितांनी बलात्कारा केल्याची घटना उघड झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे.
शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अवघ्या पाच दिवसांत तीन बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून, गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. या तिनही घटनांमध्ये अत्याचार करणारे हे एकतर शेजारी राहणारे अथवा परिसरातील रहिवासी असल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील फातमा मशिदीजवळ राहणाऱ्या एका महिलेच्या घरात घुसून वकील शेठ (रा. गट नं. २१६, रमजनापुरा) आणि मोबीन ट्रॅक्टरवाला (पूर्ण नाव माहित नाही) या दोघा संशयितांनी तिच्या बहिणीवर बलात्कार केल्याची घटना ६ मे रोजी घडली. या घटनेची वाच्यता केल्यास मोहल्ल्यातून हाकलून देऊ किंवा दोघा बहिणींना जिवे ठार मारू, अशी धमकी या दोघा संशयितांनी दिली आहे. पीडित महिलेने बुधवारी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास रमजानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस या दोघा संशयितांचा शोध घेत असून, पोलीस पथक रवाना झाले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात शहरातील पवारवाडी पोलीस ठाणे अंतर्गत दोन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एका नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. तर दानिश पार्क भागात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करीत 'त्या' घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर संशयितांनी प्रसारित केल्याचा प्रकार घडला होता. अख्तराबाद येथे नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी ४६ वर्षीय मसूद अयान मोहमद फारुन याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शहरातील ही अंतर्गत गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आवाहन मालेगाव पोलीसांसमोर निर्माण झाले आहे. 


ताज्या बातम्या