Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सटाणा तालुक्यातील क-हे शिवारात हा खुन प्रकरणात आरोपीस अखेर जन्मठेप; १३ वर्षांनी लागला निकाल..

दि . 21/05/2019

सटाणा पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी २००६ मध्ये झालेल्या एका खून प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा मालेगाव जिल्हा अपर सत्र न्यायालयाने दिला..

-सटाणा तालुक्यातील क-हे शिवारात हा खुनाचा प्रकार घडला होता.


मालेगाव - सटाणा पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी २००६ मध्ये झालेल्या एका खून प्रकरणी मंगळवारी येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयाने निकाल दिला. यातील आरोपीस न्यायालयाने जन्मठेप व १० हजार रु.दंडाची शिक्षा ठोठावली आहे. १५ जानेवारी २००६ रोजी सटाणा पोलीस ठाणे हद्दीतील क-हे शिवारात हा खुनाचा प्रकार घडला होता. यातील आरोपी अमोल जिभाऊ शिरसाठ ( वय ३७ रा. क-हे शिवार ) हा १५ जानेवारी २००६ रोजी भाक्षी येथे खंडोबाचे यात्रेत झालेल्या भांडणाबाबत समझोता घडवून आणण्यासाठी आला होता. परंतु समझोता न होता याठिकाणी फिर्यादी सुपडू भिला मोरकर यास  गैरकायद्याची मंडळी जमवून अचानक हल्ला करून मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच मृत साहेबराव केदा मोरकर यांना आरोपी शिरसाठ याने लोखंडी कोत्याने छातीवर वार करून ठार मारले होते. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक एस.आय. शेख करीत होते. त्यांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले होते. याप्रकरणी आरोपी विरुद्ध सबळ पुरावे व दोषारोप पत्र न्यायालयसमोर सादर करण्यात आले. सन २००६ पासून ते आजपर्यंत चालेल्या या खटल्यात अखेर येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एच.मोहम्मद यांनी मंगळवारी निकाल दिला. यातील आरोपी अमोल जिभाऊ शिरसाठ यास जन्मठेप व १० हजार रु दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून अशोक पगारे यांनी कामकाज पहिले.


ताज्या बातम्या