Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
एकाच आठवड्यात एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत लैंगिक व बाल अत्याचाराची दुसरी घटना..

दि . 20/05/2019

मालेगाव  शहरातील तैय्यबाबाद येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. . याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून संशयित आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.गेल्या आठ दिवसांत पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुसरी घटना समोर आल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीतील स.नं.97तैय्यबाबाद येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजता नऊ वर्षीय मुलगी खेळत असताना समोरच राहणारा मसुद अयाज फारुख बफाती याने पिडित मुलीस इशाऱ्याने घरात बोलावून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.पिडित मुलीने घडलेला प्रसंग आईस कथन केल्याने त्वरीत पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.पोलीसांनी संशयित आरोपी मसुद अयाज फारुख बफाती यांच्या विरोधात बलात्कारासह पोस्का अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहे.


ताज्या बातम्या