Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जळगाव जि. प. अध्यक्ष उज्वला पाटील यांच्या गाडीचा अपघात, गेल्या वर्षभरातील तिसरी घटना..

दि . 19/05/2019

जळगाव:- पालक मंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात सामील होण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील तातडीने मुंबईहून जळगाव येथे येण्यासाठी निघाल्या असता पहाटेच्या सुमारास नाशिक जवळील ओझर गावाजवळ जि. प. अध्यक्ष उज्वला पाटील यांच्या खाजगी इनोव्हा गाडीचा जबर अपघात झाला. सुदैवाने किरकोळ दुखापत वगळता कुठलीही जीवितहानी झाली नाही.
शनिवारी पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांचा जिल्ह्यात दुष्काळी दौरा असल्यामुळे जि. प. अध्यक्ष उज्वला पाटील, त्यांचे पती व माजी जि.प.अध्यक्ष मच्छिंद्र पाटील परिवारासह मुंबई हून रात्री बारा वाजता जळगाव साठी निघाले असता. नाशिक जवळील ओझर गावाजवळ स्पीड ब्रेकरवर गाडी असताना मागून युपी.555 या ट्रॅक ने जोराने धडक दिली. या धडकेमुळे गाडीचा मागील भाग पूर्णतः चेपला गेला. मागच्या सिटवर बसलेला उज्वला पाटील यांचा भाचा सुदैवाने बचावला. किरकोळ दुखापत वगळता कुणासही मोठी दुखापत झाली नाही.


ताज्या बातम्या