Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सवंदगाव कत्तलखाण्यास ना हरकत देणारे ग्रामसेवक निलंबित पण त्यांच्यावर ज्यांनी दबाव आणला त्यांचं काय ?

दि . 18/05/2019

ज्यां सरपंचानी माझ्या जबाबदारीने दिली काहीही झाले तर मी जबाबदार राहील असे लेखी दिलेले आहे.हे जर खरं असेल तर त्यावर व त्याबरोबर असलेले सदस्य दोषी नासावेत का असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित..


मालेगाव - सवंदगाव शिवरात कत्तलखान्याला  ना हकरत दाखला दिल्या प्रकरणी ग्रामसेवक कैलास चींतामन आहिरे यांना पंचायत समिती गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांनी  निलंबीत केले. ग्रामसभेने कत्तलखान्यांना विराेध करण्याचा ठराव केलेला असतांना आहिरे यांनी दाखल दिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
जेव्हा ह्या गंभीर प्रश्नावर सवंदगाव ग्रामस्थ ग्रामविकासमंत्र्यांच्या दरबारी पोहचले तेव्हा मंत्र्यांनी ग्रामसेवकांना खडसावले. पण त्यावेळी ग्रामसेवक यांनी सांगितले की माझ्यावर आपल्या कार्यालयात आणून ना हरकत करण्याची फाईल सागर पवार यांनी दिली.ही फाईल करावीच लागेल असा दबाव आणून ना हरकत देण्यास सांगितले.आणि हे सर्व राज्यमंत्री दरबारात आलेल्या ग्रामस्थांच्या समोर ग्रामसेवकांनी कबुली दिली.यावेळी ग्रामसेवकानी सांगितलेही होते की मला द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे आणि त्या ग्रामसेवकाचे निलंबन झाले.यावेळी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्या ठरावाच्या वेळी असलेले सर्व दोषींवर कार्यवाही करण्याचीही मागणीचा आग्रह निवेदनात करण्यात आली होती.
ग्रामसेवका बरोबरच तत्कालीन सरपंच व सदस्य यांच्यावर फौजदारी करण्याची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. कार्यालयातून ज्या सागर पवार ने कत्तलखाण्यास ना हरकत देण्यास दबाव आणला त्याचे काय? हा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
ग्रामसेवकांनी जे काही केले त्यात सरपंच सदस्यही त्यात सहभागी आहेतच.ग्रामसेवकाबरोबर त्यांचाही तेहि दोषी आहेतच.सरपंच अरुण शेवाळे यांनी तर स्वतः च्या जबाबदारीने देतो असे ताच्या सहिनीशी ग्रामसेवकाला लेखी दिले आहे.मग,त्यांच्यावर फौजदारी का होऊ नये असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.कत्तलखाण्याच्या संदर्भात यापूर्वीही असेच झाले होते.दोघेही कत्तलखाण्यास ना हरकत देण्यास आली आहे.यात कुठेतरी मंत्र्यांचा कार्यालयाचा वापर तर होत नाही ना याचे गांभीर्य स्वतः राज्यमंत्री यांनी घेणे गरजेचे आहे.


ताज्या बातम्या