Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, महिलेसह दोघे अटकेत; घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल..

दि . 16/05/2019

मालेगाव : एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करीत घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्या तिघा संशयितांना पवारवाडी पोलीसांनी अटक केली असून मुख्य संशयित अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 


शहरातील पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीतील दानिश पार्क परिसरात एका सतरा वर्षीय अल्पयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तिघा तरुणांसह एक तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संशयित महिलेने १७ वर्षीय अल्पयीन मुलीला घरातून फूस लावून एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले. त्याठिकाणी मोहमद निजामुद्दीन अब्दुल अजीज (वय २२, रा. दाशिन पार्क), अब्दुल अजिज इकबाल अहमद (वय २४, रा. दानिश पार्क), सईद वायरमन यांनी तिच्यावर अतिप्रसंग करीत त्या घटनेचा व्हिडीओ तयार करुन तो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन पोलीसांनी तिघांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करीत संशयित महिलेसह मोहमद निजामुद्दीन अब्दुल अजीज, अब्दुल अजिज इकबाल अहमद या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना  न्यायालयाने शुक्रवार (दि. १७) पर्यन्त पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मुख्य संशियित सुत्रधार सय्यद वायरमन अद्याप फरार आहे. पुढील तपास पवारवाडी पोलीस करीत आहे. 


ताज्या बातम्या