Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
बाजारातील टरबूज, खरबूज आणि कुजका भाजीपाला बनला जनावरांचा चारा..

दि . 15/05/2019

मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांबरोबरच जनावरांनाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.चारा संपला पाणीही जेमतेम आहे ,आपल्या गुरांचे पालन-पोषण करण्यासाठी शेतकऱ्याला बाजारातून चारा विकत घेणे शक्य नाही. तालुक्यात एकही शासकीय चारा छावणी सुरू झालेली नाही त्यामुळे शेतकरी आपल्या गुरांसाठी बाजारात जाऊन स्वस्त दरामध्ये भेटत असलेला कुचका माल,टरबूज, खरबूज व कूचका भाजीपाला खाऊघालून तरी जनावरांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे.

दुष्काळाकडे गांभीर्यानं पाहा,गुरांना चारा शिल्लक  नसल्याने बाजरातील टरबूज,खरबूज व भाजीपाला खाऊ घालून शेतकरी वाचवताय जनावरं..
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव,चांदवड,मनमाड,नांदगाव ह्या तालुक्यातील जनता दुष्काळामुळे कमालीची पोळून निघते आहे.पिण्याच्या पाण्यासाठी माय-माउलींची वणवण, पदरी असलेले पशुधन टिकवण्याचे आव्हान, जनावरांना  सांभाळण्यासाठी चाऱ्याची कमतरता अशा अत्यंत बिकट प्रश्नांना तोंड देत जनावरे जगवण्याचेही आव्हान शेतकरी असलेल्या ग्रामीण जनतेसमोर उभे आहे.शासनाने दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत पण तर जिल्यात तरी अजून तसे चित्र दिसत नाही.चाराच नसल्याने जनावरांना जगवण्यासाठी आता बाजारपेठा फिरून टरबूज,कुजका भाजीपाला जनावरांना मिळेल म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत.शासनाकडून चाऱ्याचा काही प्रमाणात प्रश्न सुटेल अशी आज ग्रामीण पशु पालकांना आहे.
या मालेगाव सह कसमादे च्या तालुक्यातील बाजार पेठांमध्ये चाराही मिळणे आता अवघड झाले आहे.आलेला चारा घेणेही परवडत नसल्याने शेतकत्यांनी नवा पर्याय शोधला आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारात जाऊन टरबूज,खरबूज आणि बाजारातील उरसुर भाजीपाला विकत घेऊन जनावरांना वाचवण्यासाठी धडपड करत आहेत.त्यामुळे किमान येणाऱ्या पावसापर्यंत आपापल्या जनावरांना जगवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

 यंदा राज्यात भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे मागील वर्षी पाऊस न झाल्याने शेतात पिकच आले नाही त्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून चार महिन्या पासून शासकीय कार्यालयांच्या खेट्या मारून देखील चारा-पाण्याची व्यवस्था होत नसल्याने पशुधन धोक्यात आल्याचे भयावह चित्र आहे.अश्या प्रकारे टरबूज,खरबूज आणि बाजारातील उरसुर भाजीपाला जनावरांना खाऊ घालण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
काही प्रमानातच चारा शिल्लकच असतांना इतका भयानक स्थिती भयानक आहे, पण सरकार, प्रशासन
अजून म्हणावे तितके चारा छावण्यांच्या बाबतीत गंभीर असल्याचे दिसत नाही. प्रश्न केवळ तीन-चार आठवड्यांचा नाही. पावसाने ताण दिला तर रे लक्षात ठेऊन जास्तीच्या मदतीच्या नियोजनाची गरज आहे.पाऊस सुरू झाल्यानंतरही शेतक-याला उभारीसाठी मदतीचे आव्हान सरकारसमोर आहे.त्यामुळे सरकार दुष्काळा बाबत किती गंभीर आहे या वरून लक्षात येत आहे. आतातरी सरकार  केवळ पोकळ आश्वासन न देता दुष्काळ निवारण करण्यासाठी ठोस उपाययोजना करणार का हाच खरा प्रश्न..


ताज्या बातम्या