Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव बस स्थानकावर उभ्या बसला आग..

दि . 14/05/2019

येथील नवीन बस स्थानकावर उभ्या असलेल्या सटाणा आगाराच्या बसला मध्यरात्री अचानक आग लागल्याने सर्वत्र धावपळ झाली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही.
 रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास सटाणा आगाराची मुक्कामी बस (क्र मांक एम एच ०७ सी ९१६३) उभी असतांना तिला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले.शेजारी उभ्याअसलेल्या वैजापूर आगाराच्या मुक्कामी बस (क्र मांक एम एच २० बी.एल.२६१९) चा काही भागही या आगीमध्ये जळाला.नागरिकांनी व अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. तसेच शेजारच्या एका बसला जळण्यापासून वाचविले.बसमध्ये प्रवासी व वाहक-चालक नसल्याने जीवितहानी टळली.आगीचे कारण लगेच समजू शकले नाही


ताज्या बातम्या