Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सवंदगाव ग्रामपंचायत हद्दीतील कत्तलखाण्या संदर्भातील सर्वांना हरकती व परवानग्या रद्द करून कायमस्वरूपी हरकत करावी-दादाजी भुसे

दि . 13/05/2019

मालेगाव : सवंदगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्लॅटर हाऊस, कत्तलखान्याला दिलेली ना हरकत रद्द करावी व भविष्यात अश्या परवानग्या देण्यात येऊ नये असे आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दादाभाऊ भुसे यांनी सवंदगाव ग्रामस्थांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत गटविकास अधिकारी पिंगळे यांना दिले आहेत.

               सवंदगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत वेळोवेळी सवंदगाव ग्रामपंचायत हद्दीत स्लॅटर हाऊस व कत्तलखाने यांना परवानगी देण्यात येऊ नये असे ठराव समस्थ ग्रामस्थांनी मंजूर केले होते. तरी देखील ततत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी कत्तलखाना व्यावसायिकाशी हितसंबंध जोपासत ग्रामसभेचा विरोध झुगारून ग्रामपंचायत कार्यालय सवंदगाव ता. मालेगाव यांच्या मासिक सभा दि.- २८/५/२०१८ ठराव क्र. १८ अन्वये अलशिफा अँँग्रो फूड्स तर्फे नबी अहमद अहमद उल्ला यांना त्यांच्या मालकीच्या मौजे सवंदगाव शिवारातील गट नं २२६/२, २२६/४, २२७/१/अ, २२७/१/ब, २२७/१/क मधील क्षेत्रात पशुवध गृह सह बोकड आणि निकामी म्हैस अँटीग्रेटेड स्लॅटर हाऊस कत्तलखाना व त्यावर प्रक्रिया करणारे मांस फ्रिझिंग कुलिंग हाडाचा चुरा करणारे केंद्र वापरासाठी ग्रामपंचायत सवंदगाव  तर्फे  दि १५/६/२०१८ तसेच मौला अली शेख  गट नं-६१-१/२/३ यांच्याही परवानगीस २६ /१/२०१७ रोजी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले होते. त्यास सवंदगाव ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता.  

           स्लॅटर हाऊस व त्यावरील प्रक्रिया केंद्रांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. रक्त मिश्रित पाणी परिसरात पसरून शेती व पिण्याच्या पाण्यात त्याचा अंतर्भाव होऊन पाणी पिण्या व शेती योग्य राहत नाही. प्रचंड दुर्गंधी पसरते. शेती व रहिवास धोक्यात येतो. यासर्व धोकादायकबाबींचा अनुभव दरेगाव व पवारवाडी, मालेगाव भागातील स्लॅटर हाऊस व कत्तलखाण्यांमुळे सवंदगाव भागातील नागरिक घेत असून सवंदगाव ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही प्रकारचे जनावरांवर/प्राण्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यास तीव्र विरोध ग्रामपंचायत सवंदगावच्या ग्रामसभेत समस्थ ग्रामस्थांनी वेळोवेळी केला आहे. तसेच सवंदगाव ग्रामपंचायत हद्दीत अश्या उद्योगांना परवानगी दिल्यास जनभावनेचा उद्रेक होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ग्रामविकास राज्यमंत्री दादाभाऊ भुसे यांनी आज गटविकास अधिकारी आनंद पिगळे, सरपंच पोपट शेवाळे, ग्रामसेवक आहिरे, निखिल पवार, मनोहर शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सवंदगाव ग्रामस्थांसह बैठक घेतली होती. 

            राज्यमंत्री भुसे यांनी ग्रामस्थांचा विरोध असतांना अश्या प्रकारे ना हरकत प्रमाणपत्र कसे काय दिले याबाबत ग्रामसेवक आहिरे यांना जाब विचारला असता ग्रामसेवक निरउत्तर झाले. नाशिक जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी नरेश गीते यांना भ्रमणध्वनी वरून याबाबत सविस्तर माहिती देत संबंधितांवर कारवाई करण्याची सूचना दिली. 

             यावेळी पोपट काळू शेवाळे,निखिल पवार, मनोहर शेवाळे, निशिकांत पवार, चंद्रशेखर पवार, प्रमोद पवार, राकेश आहिरे, दीपक दळवी, दादा शेवाळे, बंजूदादा पवार, पंडित आहिरे, किशोर पवार, निशांत पवार, पिकण शेवाळे, सचिन देवरे,अशोक अहिरे, दिलीप अहिरे, दिलीप शेवाळे, भिला शेवाळे, सुनील शेवाळे, किशोर पवार, हेमेंत शेवाळे, आप्पा पवार, सुरेश पाटील, अनिल सूर्यवंशी, कैलास पाटील, सुभाष पाटील, सागर पवार आदी सवंदगाव ग्रामस्थ उपस्थित होते. 


ताज्या बातम्या