Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
बेकायदा कुत्ता गोळी व गर्भपाताच्या गोळ्या विक्रीचे मालेगाव केंद्र; पाऊनेदोन लाखांचा गोळ्या साठा जप्त व दोन जण पोलिसांच्या अटकेत.

दि . 12/05/2019

मालेगावची तरुण पिढी आता वेगळ्याच नशेच्या विळख्यात सापडली असून, कुत्ता गोळी असे या नशेचे नाव आहे . कुत्ता  गोळीच्या सेवनाने शहरात गुन्हेगारी कारवाया वाढ झाली असून तरुण व महाविद्यालयीन जीवन उध्वस्त करणारी कुत्ता गोळीचे लोन राज्यभर पसरू लागले आहे. थेट राज्याच्या अन्न व औषध प्रशासन व पोलिस यंत्रणेने गंभीर दखल घेत मोठी कार्यवाही केली आहे.१ लाख ७१,हजार  रुपयांच्या alprozolai Tu गोळ्या जप्त व दोन जणांनाही पोलिसांनी केले अटक करत मालेगाव शहर पोलिसांनी मोठी कार्यवाही केली आहे.या संदर्भात सविस्तर आढावा घेतला आहे कसमादे अपडेट वर.

अल्प्रालोझम नावाची ही गोळी झोप न येणे व मेंदूशी स्ंबंधीत रूग्णाला दिली जाते. हि गोळी खाल्ल्याने स्व:तावरचे नियंत्रण सुटते  व एक वेगळीच नशा होत असल्याने या गोळीला कुत्ता गोळी म्हटले जाते. ही टॅब्लेट शेड्युल वन कॅटेगरीत येत असल्याने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही गोळ्या देता येत नाही.मात्र मालेगाव शहरात या गोळीची सर्रास बेकायदेशीर विक्री होत असून अनेक महाविद्यालयीन विधार्थी व तरुण या नशेच्या आहारी जात आहे.विशेष करून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या गोळीचे सेवन करून  गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी  कारवाया  करीत असल्याचे पुढे आले आहे.  मालेगाव शहरात  बेकायशीरपणे गोळ्यांची तस्करी होत असून सहज या  गोळ्या उपलब्ध होत असल्याने शहरवासीयांनी चिंता व्यक्त केली आहे. कुत्ता  गोळी विक्री करणारी मोठे रॅकेट यामागे  सक्रिय असून, कुत्ता  गोळीच्या बेकायदेशीर विक्रीला आळा घालावा यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.यावर लक्ष ठेवत पोलिसांना एवढया मोट्या प्रमाणात या गोळ्या मिळून आल्याने हि मोठी कार्यवाही केली आहे.

शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या  प्रश्नाबरोबरच तरुण पिढी या जीवघेण्या नशेच्या आहारी जात असल्याने पोलीस प्रशासनाने व अन्न व औषध प्रशासनाच्या  साथीने  कुत्ता गोळी विरोधात जोरदार मोहीम उघडली असून, सहा महिन्यात कुत्ता गोळीची बेकायदेशीर विक्री करणाऱ्याविरुद्ध सात कारवाया केल्या असून मोठ्या प्रमाणात गोळ्या जप्त केल्या तर दोन जणांना अटक केले.

 कुत्ता गोळीमुळे शहरातील गुन्हेगारी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून सराईत गुन्हेगार कुत्ता गोळीचे सेवन करून गंभीर स्वरूपाचे  गुन्हे करीत असल्याने  शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या  प्रश्नाबरोबरच तरुण पिढी या जीवघेण्या नशेच्या आहारी जात असल्याने पोलीस प्रशासनाने व अन्न व औषध प्रशासनाच्या  साथीने  कुत्ता गोळी विरोधात जोरदार मोहीम उघडली असून, सहा महिन्यात कुत्ता गोळीची बेकायदेशीर विक्री करणाऱ्याविरुद्ध सहा कारवाया केल्या असून हजारो गोळ्या जप्त केल्या तर बारा जणांना अटक केली . 

निलोत्पल-अप्पर पोलीस अधीक्षक-मालेगाव

 

शक्यतो मानसिक आजार व झोप ने येणे  या रुग्नांसाठी अल्प्रालोझम हि गोळी अल्प प्रमाणात देण्यात येते मात्र मालेगावात या गोळीचा नशेसाठी वापर होत  असल्याचे समोर आले आहे. कुत्ता  गोळी नावाने संबोधल्या जाणाऱ्या या गोळीच्या अतिसेवनाने शरीरावर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात असे  वैद्यकीय  जाणकारांचे  मत आहे . 

 

कुत्ता गोळीचे लोन आता राज्यभरपसरू लागल्याने आता थेट अन्न व औषध  प्रशासनाने यात लक्ष घातले असून तरुण पिढीला देशोधडीला  लावणाऱ्या कुत्ता गोळीची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी आता शासनाने कडक उपाय करण्याची गरज आहे .

देवा पाटील-सामाजिक कार्यकर्ते


ताज्या बातम्या