Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावी बारा बलुतेदार हि समाजसेवी संस्था भागवतेय तालुक्यातील जनावरांची तहान...

दि . 10/05/2019

मालेगावी समाजसेवी संस्था भागवताय तालुक्यातील जनावरांची तहान.बारा बलुतेदार मित्र मंडळ  व सयाजी सृष्टी यांच्या तर्फे  तालुक्यातील अनेक वस्त्या व  गो शाळेतील जनावरांची भगतेय पिण्याच्या पाण्याची निशुल्क तहान.

जनावरांच्या चाऱ्यासाठी २१ हजार रुपयाची देणगी.  

मालेगाव तालुक्यात सध्या मागील काही महिन्यापासून भीषण पाण्यची टंचाई सुरु असतांना नागरिकांनाच नव्हे तर तालुक्यातील गुरेढोरांची  पाणी  व चारा अभावी बंद से बत्तर अशी परिस्थिती होत चालली आहे. यासाठी प्रशासन पुरेश्या प्रमाणात नागरी वस्त्यामध्ये तहान भागवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तारेवरची कसरत करतांना दिसत आहेच. पण, ते प्रयत्न पुरेसे होत नाहीत कारण त्याने नागरिकांची तर तहान भगतेय पण जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे.तालुक्यातील जनावरांना पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याचे समोर आले आहे.आणि त्या जनावरांचे पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी काही समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेतल्याने नवा आदर्शच तालुक्याला घालून दिला आहे. काहीं प्रमाणावर तरी जनावरांना लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या निमित्ताने सुटला आहे.मालेगावातील या परिस्थितीची दखल घेत बारा बलुतेदार मित्र मंडळ व सयाजी सृष्टी यांनी  गुरांची खाण्यापिण्यासाठी असलेली गंभीर परिस्थिती बघता जो पर्यंत वरूनराजेचे पुरेश्या प्रमाणात आगमन होत नाही. तोपर्यंत बारा बलुतेदार मित्र मंडळातर्फे दरदोज दोन टँकर पाण्याच्या फेऱ्या तालुक्यातील अनेक वस्त्या व  गो शाळेतील जनावरांची स्वखर्चाने पुरवल्या जात आहेत आणि पुरवल्या जातील यासाठी नियोजन केले असल्याचे यांनी सांगितले.  

यावेळी गुरांच्या चाराच्या प्रश्न बघता फुल ना फुलाची पाकळी स्वरूपात एकवीस हजार रुपयाची  देणगीही बारा बलुतेदार मंडळातर्फे देण्यात आली. 

तसेच तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती मुळे गोशाळा मध्ये असलेल्या जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे.पाणी उपलब्ध करणे फार जिकरीचे झाले आहे.त्यामुळे सेवाभावार्थ दानशूर व्यक्ती किंवा सेवाभावी संस्थांनी यासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहनही केले आहे.यावेळी कंक्राळे येथील गो शाळेच्या वतीने बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या बंडू काका बच्छाव,कमलाकर पवार,रामचंद्र हिरे,युवराज कदम,पिंटू अहिरे,राजेंद्र सराफ,रविश मारू,विकास दासनुर यांचे मनापासून आभार मानले.

या निमित्ताने बारा बलुतेदार मित्र मंडळाने जनावरांच्या चारा आणि पाण्याच्या प्रश्न सोडण्याचा अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे.त्याच्या या कार्याचे कौतुक सटाणा,चांदवड व मालेगाव परिसरात केले जात आहे.बारा बलुतेदार व सयाजी सृष्टीच्या याकार्याला सलाम.


ताज्या बातम्या