Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
निम्मेहून अधिक गावांमध्ये दुष्काळ झळा तीव्र; मालेगाव तालुक्यात ट्रंकरग्रस्त गावांनी ओलांडली शंभरी..

दि . 08/05/2019

रणरणत्या उन्हामुळे आटले जलसाठे, पाण्यासाठी लावलेली भांड्यांची रांग, तासनतास पहावी लागणारी ट्रंकरची वाट आणि पाण्यासाठी उडणारी झुंबड...

दुष्काळाचे हे भीषण चित्र मालेगाव तालुक्यातील अर्ध्याहून अधिक गावे व वाड्यांवर निर्माण झाले आहे. तालुक्यातील ३२ गावे ८४ वाड्यांची तहान सध्या ४४ ट्रंकरद्वारे १२२ फे-या करून भागवली जाते आहे. मे महिना सुरु झाला असून अजून किमान दीड महिना तरी वरुणराजाची वाट पहावी लागणार असल्याने तालुक्यातील दुष्काळ झळा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने  तालुक्यातील गावांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र झाली आहे. दुंधे, व-हाणे , टाकळी, मेहुणे, चौकटपाडे, झाडी, निमगाव, जळगाव ( नि) च्या वाड्या, चोंढी या गावांच्या तर पाचवीलाच दुष्काळ पुजला असल्याने ट्रंकरग्रस्त गाव अशी या गावांची ओळख बनू पाहते आहे. 

यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने नाशिकच्या येवला मनमाड नांदगाव मालेगाव या तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावा लागत आहे काही ठिकाणी तरी आठ,पांधरा दिवसांनंतर टँकर येतो किंवा पाणी लोकांना मिळत असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पाण्याची आणीबानी अशी सध्या नाशिक विभागात परिस्थिती निर्माण झाली आहे. दिड महिना अद्याप बाकी आहे त्यामुळे योग्य पद्धतीने पाण्याचे नियोजन करणं आवश्यक आहे नाहीतर मोठा संकट येणाऱ्या काळात नाशिक जिल्ह्यात मध्ये येऊ शकते.नाशिकमधील नांदगाव, सिन्नर, मालेगाव, येवला, बागलाण, चांदवड, देवळा हे तालुके पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करीत आहेत. दाराच्या उंबऱ्यात आलेल्या पाण्याचे संकट या राक्षसाला थोपविण्याची गरज आहे.


ताज्या बातम्या