Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव शहरात भरदिवसा पिस्तुलचा धाक दाखवून मारहाण व लूट..

दि . 05/05/2019

मालेगाव शहरातील ताशकंद बाग या ठिकाणी एका बंगल्यात राहत असलेल्या वृद्ध महिलेसह तिच्या मुलावर हल्ला करून पिस्तूल चा धाक दाखवून मारहाण करून लाखोंची लूट केल्याची घटना घाडली आहे.
वृद्ध महिलेचे नाव फातिमा शब्बीर हकीम तर तिच्या मुलाचे नाव अशरफ शब्बीर हकीम असे आहे.
वृद्ध महिला ही माजी आमदार स्वर्गीय आयशा हकीम यांची बहीण आहे.पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु आहे.
भर दिवसा वृद्ध महिला आणि तिच्या मुलावर झालेल्या हल्ल्यामुळे पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला दिसत नाही.
गेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये जबरी चोरीचा हा दुसरा प्रकार आहे.
 


ताज्या बातम्या