Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




चांदवड शहरालगत दरोडेखोर अन गावकऱ्यांत झटापट; एका चोराचा मृत्यू;एक जखमी, तीन फरार.

दि . 05/05/2019

चार गावकरी जखमी

चांदवड शहरात लगत असलेल्या खैसवाडा वस्तीवर अज्ञात पाच ते सहा लोकांनी नामदेव मोरे यांच्या कुटुंबियांवर हल्ला करून मोरे यांना गंभीर जखमी केले. मोरे यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावले यात चोरटे व गावकऱ्यांमध्ये तुफान हाणा मारी होऊन यात एका चोराचा जागीच मृत्यू तर ४  लोक गंभीर जखमी झाले. 

नामदेव मोरे हे आपल्या खैसवाडा वस्तीवर आपल्या कुटुंबियासह बाहेर झोपलेले असतांना एका टोळक्याने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी मोरे यांच्या कुटुंबियांनि आरडाओरड केल्याने शेजारील ग्रामस्थ आले यात झटापट होऊन एका चोराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार फरार झाले. या चार पैकी आणखी एका चोराला पकडण्यात यश आले असून त्याच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी मालेगाव येथे रेफर करण्यात आले आहे.

घटनास्थळी मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक निलोतपल, उपविभागीय पोलीस अधिकारी रागसुधा यांनी भेटी दिल्या असून ते रात्री उशिरापर्यंत चांदवड परिसरात चोरांच्या मार्गावर होते.


ताज्या बातम्या