Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात वनरक्षकास मारहाण ..

दि . 03/05/2019

मालेगाव - ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत वृक्ष लागवडीसाठी खड्डे करणा-या वनरक्षकास मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रकार शहरातील भारदेनगर येथे घडला. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. भारदेनगर येथील राखीव जागेत वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत मजूर युवराज बोरसे काम खड्डे करीत असतांना आरोपी रामदास गायकवाड ( रा. डोंगराळे ता. मालेगाव ) याने याने काम थांबले. मजूर बोरसे यांनी वनरक्षक अशोक जगन्नाथ शिंदे यांना याविषयी फोनवरून माहिती दिली. शिंदे हे लगेचच त्याठिकाणी गेले असता आरोपी गायकवाड याने आमच्या जमिनीत चारी का खोदली? अशी कुरापत काढली. यावर शिंदे यांनी सदर जमीन शासनाची असल्याचे समजून सांगत तुम्ही अतिक्रमण करू नका असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपी गायकवाड व अन्य चार जणांनी फिर्यादी वनरक्षक शिंदे यांना मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ गहाळ झाली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मारहाण, शिवीगाळ व शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ताज्या बातम्या