Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
महाराष्ट्र दिनी मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या..

दि . 02/05/2019

मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील शेतकरी मेघशाम भिकन खैरनार या ५५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोकळ आश्वासन, शेतीमालाला मिळणारा अल्प बाजारभाव, वाढलेला उत्पादन खर्च यात शेतकरी वर्गाची मोठी ससेहोलपट होत असल्याने तालुक्यात सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित झाले आहे.

मालेगाव - गेले तीन वर्ष सततची नापिकी,शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा वाढता डोंगर, आजारपण व प्रापंचिक चिंता यामुळे वैफल्यग्रस्त होत तालुक्यातील पाटणे येथिल मेघश्याम भिकन खैरनार (५५) या शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली.दरम्यान झालेल्या या घटनेची पोलीस व महसूल प्रशासनाने दखल घेतली आहे.घटनास्थळी तहसीलदार राजपूत यांनी भेट दिली.
  तालुक्यातील शेती व शेती व्यवसाय दिवसेंदिवस डबघाईस जात आहे. शासनाकडून कर्जमाफीचे मिळालेले पोकळ आश्वासन, शेतीमालाला मिळणारा अल्प बाजारभाव, वाढलेला उत्पादन खर्च यात शेतकरी वर्गाची मोठी ससेहोलपट होत असल्याने तालुक्यात सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित झाले आहे. मेघश्याम खैरनार याचे नावावर पाटणे येथे अडीच एकर शेती आहे. मात्र गेले तीन वर्ष त्यांना शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळाले नाही. ते शेती साठी घेतलेले कर्जही फेडण्यास असमर्थ ठरले होते. 


ताज्या बातम्या