Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आमदारांचे भाऊ माजी नगरसेवक खालिद हाजी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल...

दि . 30/04/2019

मालेगाव मध्यचे आमदार असिफ शेख यांचे भाऊ माजी नगरसेवक हाजी खालिद शेख यांच्यावर  आयशा नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.मतदानाची वेळ संपल्यावरही मतदान केंद्रात जाऊ द्या असा आग्रह धरत बंदोबस्तात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना अरेरावी, दमबाजी, सरकारी कामात अडथळा आणि धक्का बुक्की केल्याचा पोलिसांकडून गुन्हा दाखल.
उस्मान गनी शाळेतील मतदान केंद्रावर झाला हा प्रकार झाला असून हाजी खालिद शेख रशीद हे मतदान केंद्रावर सायंकाळी सहाच्या नंतर मतदान वेळ संपल्यानंतरही मतदान करण्यासाठी मतदारांना जाऊ देण्याचा आग्रह करत असल्याने बंदोबस्तासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला.निवडणुकीचा कालावधी सायंकाळी सहाच्या वेळेत मतदारांना शाळेच्या १०० मीटरच्या आत  मतदानासाठी घेण्यात आले होते.परंतु वेळ संपल्यानंतर ही येणाऱ्या मतदारांसाठी  मतदान चालू ठेवावे अशी मागणी खालिद हाजी यांच्याकडून होत होती. त्यामुळे पोलिस आणि त्यांच्या वाद निर्माण होऊन दमबाजी केली असल्याचा आरोपही या फिर्यादीत करण्यात आला आहे.म्हणून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर अयशा नगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याबाबतीत पोलीस निरीक्षक आर.एन.पडवळ हे तपास करीत आहेत.या सर्व घटनेची चित्रफित असल्याच्या आधारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


ताज्या बातम्या