Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धुळे लाेकसभेसाठी ५६.६८ टक्के मतदान; पहा अंतिम आकडेवारी मतदारसंघ निहाय..

दि . 30/04/2019

धुळे लाेकसभा मतदारसंघात सरासरी ५६.६८ टक्के मतदान झाले. धुळे लाेकसभा मतदार संघासाठी १ हजार ९४० केंद्रावर साेमवारी मतदान झाले. मतदारसंघात १९ लाख ४ हजार ८५९ मतदारांपैकी ५८ टक्के म्हणजेच ११ लाखांपेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी पहिल्या टप्प्यात मतदानासाठी गर्दी झाली हाेती. दुपारी ११ वाजेनंतर काही प्रमाणावर गर्दी उन्हामुळे कमी झाली. मात्र दुपारी चारनंतर पुन्हा मतदारांनी केंद्रावर गर्दी केली हाेती. 


धुळे लोकसभा मतदान टक्केवारी 

धुळे ग्रामीण- 61.80

शिंदखेडा- 57.55 %

धुळे शहर- 49.8 %

मालेगाव (मध्य)- 50.30 %

मालेगाव (बाह्य)- 56.52 %

बागलाण- 64.33 %

एकूण टक्केवारी- 56.68%


ताज्या बातम्या