Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
हिमालयात हिममानव असल्याचा भारतीय सैन्याकडून दावा; पाऊलखुणांचे फोटो..

दि . 30/04/2019

बर्फाळ प्रदेशातील हिममानवाविषयी आपण नेहमीच चर्चा ऐकतो. याविषयीच्या कथाही रंगवून सांगितल्या जातात. मात्र, आता हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिममानवाच्या पावलाचे ठसे आढळले असून भारतीय सैन्यानेच ट्विटरद्वारे हे फोटो प्रसिद्ध केले आहे. यामुळे हिममानवाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

भारतीय सैन्याच्या पथकाला ९ एप्रिल रोजी मकालू बेस कॅम्प येथे रहस्यमय पावलांचे ठसे आढळले. नेपाळ- चीन सीमेजवळचा हा परिसर आहे. हे ठसे मानवी पावलासारखे दिसत असले तरी त्यांचा आकार ३२ X १५ इंच इतका होता. या भागातील कोणत्याही प्राण्याच्या पावलांचे ठसे इतके मोठे नसल्याने सैन्याचे पथकही संभ्रमात पडले होते. मात्र, हे ठसे फक्त एकाच पायाचे आहेत.


ताज्या बातम्या