Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
गेल्या चार वर्षांपासून अधिवसी वस्ती मतदानापासून वंचित; ३५० पेक्षा अधिक लोकांचे नावेच यादीत नाहीत..

दि . 28/04/2019

मालेगाव शहरातील म्हाळदे शिवारात असलेल्या कचरा डेपो शेजारी १०० पेक्षा अधिक आदीवासी सफाईकामगार कुटुंब आणि कचरा वेचनाऱ्या गरीब लोकांच्या वस्तीमध्ये अनेक दशकांपासून कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.रस्ते,लाईट,गटार,शाळा,दवाखाने या सुविधांपासून तर ही वस्ती वंचित आहेच पण गेल्या अनेक वर्षांपासून यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट न झाल्यामुळे लोकसभेच्या मतदानापासून हे गरीब वंचित राहणार आहेत.या वस्तीचे दृश्य पहिल्या नंतर केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आणि दावे फोल ठरतात.३५० अधिक लोकांनी मतदान न करणे किंवा त्यांच मतदान यादीत नावच नसणे निवडणूक आयोग आणि त्यांचे अधिकारी त्यांच्या कामाची पोलखोल करीत आहे.त्यांना कोणत्याच प्रकारची सुविधा मिळत नाही म्हणूनही या आदीवासिंची मतदानासंदर्भात उदासीनता दिसून येते..


ताज्या बातम्या