Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव बाह्य,मालेगाव मध्य आणि बागलाणची मतदान यंत्रणा सज्ज..

दि . 28/04/2019

लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान  होण्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य आणि सटाणा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रक्रियेची शासकीय तयारी पूर्ण झालेली असून आज कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवाजी जिमखाना तर मालेगाव बाह्य मतदारसंघ विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातून मतदान साहित्य वाटप झाले. सकाळी अकरापर्यंत साहित्य वाटप केल्यानंतर कर्मचारी आरक्षित केलेल्या वाहनातून मदत केंद्र पण साहित्य घेऊन रवाना झालेत.मालेगाव मध्य,बाह्य आणि सटाणा येथील मतदान केंद्रातील मतदारांची संख्या वाढल्याने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी तिन्ही मतदारसंघात 280 सहाय्यक मतदान केंद्र वाढवण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी  वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी घरापासून ते मतदार केंद्र मधून मतदान झाल्यानंतर पुन्हा घरी सोडले जाणार आहे.मालेगाव बाह्य,मालेगाव मध्य आणि बागलाण मिळून 929 मतदान केंद्र असणार आहेत.


ताज्या बातम्या