Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराच रडण्याच ढोंगाला मुस्लिम मतदार बळी पडणार नसल्याची मालेगाव मध्य मतदार संघात जोरदार चर्चा..

दि . 27/04/2019


मालेगाव - बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहमद यांच्या प्रचारासाठी एमआयएम नेते असदुद्दिन ओवैसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत चक्क वंचित आघाडीचे उमेदवार नबी अहमद हे भाषण करतांना भावूक झाले आणि भाजपला मदत व्हावी यासाठी आपली उमेदवारी असल्याची बदनामी केली जात असल्याचे सांगत नबी यांना भर सभेत रडू कोसळले. त्यांच्या या भावूक होण्यामागे मात्र ढोंग  असून मुस्लीम मतदार त्यांच्या ढोंगीपणास बळी पडणार नसल्याची दावा मुस्लीम समाजातील आजी माजी नेत्यांनी केला आहे. 

आपल्या भाषणात नबी यांनी आपली बदनामी केली जात असल्याचा सूर आवळला. माझ्या उमेदवारीसाठी भाजपकडून काही करोडोची आर्थिक घेवाण देवाण झाली आहे असा काही आरोप करीत माझी बदनामी केली जात असल्यामुळे आपण व्यास्थित झाल्याचे सांगत नबी अहेमद यांच्या डोळ्यात पाणी आले. मात्र त्यांच्या या भावूक नाट्याबद्दल मुस्लीम समाजातील नेत्यांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. 
त्यांनी रडण्याचे ढोंग करत मतदारांना आपल्या प्रति सहानुभूती दाखण्याचा प्रयत्न केला. मात्र मुस्लिम मतांचे विभाजन होऊन काँग्रेस उमेदवाराचे मतदान फोडण्यासाठी सुपारी दिल्याचा त्यांच्या बाबतीत काही मुस्लिम समाजातील आजी माजी नेत्यांकडून मतदारसंघात पोहचवला जात आहे.


ताज्या बातम्या