Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अखिल भारतीय गाे कृषीसेवा संघाकडून तालुक्यातील पहिली दुष्काळी चारा छावणी

दि . 26/04/2019

मालेगाव तालुक्यातील दुष्काळ, पाणी व चाराटंचाई यावर उपाययाेजना करण्यासाठी शासनाबराेबरच स्थानिक स्तरावर काही उपाययाेजना करण्याच्या संकल्पनेतून अखिल भारतीय गाे कृषीसेवा संघाकडून मांजरे येेथे गुरांसाठी चारा छावणी सुरू करण्यात आली आहे.संघाकडून माळमा‌थ्यावर दाेन छावण्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. 

यात पुनर्वसनासाठी ५०० गुरे दाखल झाली आहेत. तालुक्यातील  गुरांची ही पहिली छावणी आहे. अशी माहिती संघाचे कार्याध्यक्ष डाॅ. सुगन बरंठ यांनी यांनी दिली. यात मांजरे, अंधारपाडे, सावकारवाडी, शिरसोंडी, टाकळी व सोनज येथील शेतकरी बांधवांच्या ५०० गुरांच्या चारा-पाण्याची सोय केली आहे. ही संख्या दाेन हजारांपर्यंत वाढू ही शकते. छावणीत चारा संस्थेच्या वतीने दिला जात आहे. पाण्याची व्यवस्था करण्याचे शासनाने मान्य केले आहे. तरीही संस्थेने आपत्कालीन पाणी व्यवस्था ठेवली आहे. गुरांना सावलीसाठी हिरवी नेट जाळी छावणीत उपलब्ध करून देण्याचे काम ही बऱ्याच प्रमाणात करण्यात आले आहे. गव्हाणीसाठी टाक्या व बांबू व्यवस्था करण्यात येत आहे. याकरिता मुंबई येथील वर्धमान परिवार, ग्रामस्वराज समिती महाराष्ट्र व ध्यान फाउंडेशन या संस्थांनी सहकार्य केले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष केशरीचंद मेहता यांनी दिली. 

माहितीसाठी शेतकऱ्यांनी लालचंद त्र्यंबक यांच्याशी (माेबाइल क्रमांक ९८२३२९५३२१) संपर्क करावा, असे आवाहन कार्याध्यक्ष डॉ. बरंठ यांनी केले आहे. 
 

मांजरे येथील चारा छावणीप्रमाणेच तालुक्यातील पूर्व-दक्षिण भाग, माळमाथा परिसर येथे ही छावण्या सुरू करण्याची संस्थेची तयारी आहे. प्रत्येक ठिकाणी ही संख्या गरजेनुसार वाढवण्याची ही तरतूद झालेली आहे. 


ताज्या बातम्या