Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आघार येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरती सिह यांच्याकडून कायदासुव्यवस्था पाहणी..

दि . 25/04/2019

मालेगाव तालुक्यातील आघार येथिल काही दिवसापूर्वी झालेल्या दंगलीच्या निमित्ताने जातीय तेढ निर्माण होऊन तालुक्यात मोठा तणाव निर्माण झाला होता.वेळीच प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर लक्ष घालून शांती प्रस्थापित करण्यात यश मिळाले होते.परंतू त्या प्रकरणामुळे आघार हे अतिसंवेदनशील मतदार केंद्र असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था टिकवून राहावा.आणि जास्तीत जास्त मतदान येऊन जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी पोलीस यंत्रणेकडून काटेकोर लक्ष ठेवण्यात यावे यासाठी नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिह यांनी आघार व ढवळेश्वर जि.प शाळा येथील संवेदनशील मतदान केंद्राना व गावांना भेट देऊन पाहणी करून त्यांनतर वडणेर खा.पोलिस स्थानकात जाऊन आढाव घेतला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वडनेर खाकुर्डी पोलिस स्थानकातील कर्मचारी यांना कायदा व सूव्यवस्थेच्या दुष्टिकोनातून मार्गदर्शन करून मतदान शांततेत पार पाडण्यासाठी योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करून सतर्क राहण्याबाबत सूचना देण्याचे आल्यात.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल हे हि हजर होते. 


ताज्या बातम्या