Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शेवटी विखे पाटलांनी दिला राजीनामा आणि नगर जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त..

दि . 25/04/2019

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजन यांने भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवली. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. विखे-पाटील यांचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारला आहेत. तसेच नगरची जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे.

काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अहमदनगरमध्ये चर्चा रंगत होती.


ताज्या बातम्या