Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
काँग्रेस वाल्याना झोपेतही मोदी दिसतात आणि ते दचकून उठतात-मुख्यमंत्री

दि . 24/04/2019

राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे करमणूक असून जसे मुगलांना धनाजी-संताजी स्वप्नात दिसत होते तसे मोदी काँग्रेस वाल्याना दिसतात आणि ते दचकून उठतात असा हल्ला बोल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राहुल गांधी वर केला

सटाणा येथे भाजप उमेदवार डॉ .सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेत बोलतांना मुख्यमंत्र्यांनी आगामी लोकसभा ही देशाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे.देश सुरक्षित हाती देण्याची गरज आहे .आणि देश सुरक्षित  ठेवण्याची क्षमता फक्त  पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्येच आहे .त्यामुळे पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त करून  पंतप्रधानांच्या विकासकामांच्या  उहापोह केला  काँग्रेसच्या  घरणेशाहीवार सडकून टीका केली

आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस,शरद पवार,मनसे,राज ठाकरे यांच्यावर एक शब्द ही बोलले नाही शिवाय शेती,दुष्काळ व शेतकऱ्यांच्या समस्या वर  काहीच न बोलल्याने उपस्थितांचा हिरमोड झाला.


ताज्या बातम्या