Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
गुणवत्तेलाच मूल्य आणि मान्यता लाभते - कमलाकर देसले., अध्यात्मिक व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात विद्यार्थ्यांशी संवाद..

दि . 23/04/2019

 

मालेगाव - जीवन मूल्यवान आहे. गुणवत्तेलाच या जगाच्या बाजारात मूल्य आणि मान्यता लाभते. अभ्यास, परिश्रम, अंगीकृत कामातील सातत्य यामुळेच गुणवत्ता सिद्ध होते. जगाच्या बाजारात रद्दी चालत नाही. मूल्य आणि मान्यता असलेले चलनच चालते. प्रत्येक विद्यार्थ्याने या स्पर्धेच्या बाजारात आपले व्यक्तिमत्व चालनासारखे मूल्यवान बनवायला हवे. नोट कागदाचीच असली तरी सगळे कागद नोटा नसतात. गुणवत्तेलाच मूल्य आणि मान्यता लाभत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचे वेगळेपण आणि सामाजिक उपयोगिता सिद्ध करावी. असे प्रतिपादन कमलाकर देसले यांनी केले.

 

येथील संदीप सुधाकर सोनजे महाविद्यालय झोडगे येथे पसायदान प्रतिष्ठान कंधाने आयोजित अध्यात्मिक व्यक्तिमत्व विकास शिबिरात 'मूल्यवान बनू या' या विषयावर कमलाकर देसले प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

 

रद्दी कागद, कोरे कागद, चमकीचे कागद आणि नोट या प्रत्यक्ष साहित्याच्या स्वरूपात कमलाकर देसले यांनी व्यक्तिमत्त्वातील फरक आणि गुणवत्तेचा प्रवास उलगडून दाखवला. प्रेझेंटेशन आणि त्यावरील भाष्य यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची मते नोंदवलीत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेवती जोशी या होत्या. ह.भ. प. प्रकाश महाराज गांगुर्डे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. गेल्या अकरा वर्षांपासून पसायदान प्रतिष्ठान कंधाने तर्फे अकरा शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. उन्हाळी सुटीचा सदुपयोग व्हावा, मुलांचा सृजनात्मक विकास व्हावा, मुले देशाचे जबाबदार नागरिक व्हावेत म्हणून सदर शिबिराचे आयोजन केले जाते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सचिन महाराज देवरे यांनी केले.


ताज्या बातम्या