Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी इसिसने स्वीकारली

दि . 23/04/2019

- श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि नजिकच्या परिसरात रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (इसिस) स्वीकारली आहे. आतापर्यंत सुमारे 320 जणांचा रविवारी घडवून आणलेल्या या साखळी बॉम्बस्फोटांमुळे मृत्यू झाला असून, शेकडोजण जखमी झाले आहेत. दरम्यान, श्रीलंकेमध्ये चर्च आणि हॉटेलला लक्ष्य करून हे बॉम्बस्फोट ख्राईस्टचर्च येथील मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी घडवून आणण्यात आल्याचे श्रीलंकन सरकारने आज संसदेत सांगितले होते.

या साखळी बॉम्बस्फोटांमागे हात असल्याचा दावा श्रीलंकेतील स्थानिक इस्लामी कट्टरवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) हिचा करण्यात आला होता.

पण आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नव्हती. अखेरीस आज या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी इसिसने स्वीकारली. इसिस या दहशतवादी संघटनेने अल अमाक या यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले आहे.

जगभरात रविवारी ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते. या बॉम्बस्फोटात 320 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर 500 हून अधिक जण जखमी झाले होते या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे.


ताज्या बातम्या