Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
केबल टिव्ही आणि डीटीएचसाठी ट्राय चा कडक इशारा

दि . 23/04/2019

केबल टिव्ही आणि डीटीएच सेवा देनाऱ्यांकडून जर निश्‍चित केलेले दर आणि नियमांचा भंग झाल्याचे आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात 'ट्राय'ने दिला आहे. या केबल आणि डीटीएच सेवा पुरवठादारांच्या ग्राहक व्यवस्थापनाचे आणि अन्य 'आयटी सिस्टीम्स'चे लवकरच लेखा परीक्षण केले जाईल असेही 'ट्राय'ने म्हटले आहे.

ग्राहकांची निवड आणि ग्राहकांच्या आवडीबाबत विचारणा केली जाऊ शकणार नाही आणि त्याबाबत कोणतीही तडजोडही केली जाऊ शकणार नाही. ज्या केबल आणि डीटीएच कंपन्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांना त्याबाबत परिणामांना सामोरे जावे लागेल, असे 'ट्राय'चे अध्यक्ष आर.एस. शर्मा यांनी सांगितले.

ग्राहकांच्या गैरसोयीबाबतच्या तक्रारी मिळाल्या असून या तक्रारी सॉफ्टवेअर आणि सिस्टीमशी संबंधित आहेत. ग्राहकांच्या निवडीच्या वाहिन्या वितरकांकडून दाखवल्या जात नसल्याच्या या तक्रारी आहेत. ग्राहकांची निवड हाच या नियमांच्या चौकटीचा मुख्य उद्देश आहे. जर वाहिन्यांची निवड मर्यादित ठेवली जात असेल, ते काही नियामकतेच्या चौकटीच्या मुख्य हेतूला अनुसरून नसेल, असे शर्मा म्हणाले.

'ट्राय'ने 9 कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून 5 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. गेल्या आठवड्यात जीटीपीएल, हॅथवे सिती नेटवर्क यासारख्या 6 केबल चालक कंपन्यांनी दर आकारणीबाबतच्या नियम भंग केल्याबद्दल त्यांना सूचना बजावण्यात आल्या आहेत.


ताज्या बातम्या