Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आईचे आशीर्वाद घेऊन केले नरेंद्र मोदींनी मतदान..

दि . 23/04/2019

लोकसभा निवडणूक 2019च्या महासंग्रमातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. राज्यातील 14 मतदारसंघांसह देशातल्या एकूण 117 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या दिग्गाजांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. दरम्यान, गुजरात येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगरमधील निवासस्थानी दाखल झाले असून मतदान केेलं आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मतदान केंद्राबाहेर दाखल झाले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईचे दर्शन घेऊन मतदान करत संपूर्ण देश वासियांना यांनाही मतदान करण्याचे आवाहन केले.


ताज्या बातम्या