Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वडगांवात चैत्रउत्सव यात्रा आनंदात साजरी.. 

दि . 22/04/2019

मालेगाव::- सालाबादप्रमाणे आई भवानी देवीची यात्रा आनंदात संपन्न झाली.सकाळ पासूनच देवी मंदिर व परिसर भाविक भक्तांनी दुमदुमून गेला होता.सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावातून देवीच्या रथाची मिरवणूक निघाली.या मिरवणुकीत मोठया प्रमाणावर ग्रामस्थ सहभागी होते.रात्री उशिरापर्यंत यात्रेत भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.
 दुसऱ्या दिवशी  कुस्त्यांची स्पर्धा आयोजित केली होती.त्याच दुसऱ्या दिवशी रात्री लोकनाट्य तमाशा चे आयोजन केले होते.या लोकनाट्य मंडळाच्या करमणूकीच्या कार्यक्रमात पंचक्रोशीतील लोकांची उपस्थिती होती.यात्रेत कायदा व सुव्यवस्था राखणेकामी वडनेर खा. प्रभारी पोलीस अधीक्षक रामेश्वर मोताळे,सुनील एस.बावा व वडगांवचे पोलिसपाटील खुशालचंद शिंदे यांनी कामकाज पाहिले.
यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी शशिकांत राजकोर, शिवाजी देवरे, मनोज खैरनार, ताराचंद खैरनार, दिपक शेवाळे, गोरख ठोके, समाधान देवरे, रवी निकम, मुरलीधर खैरनार, आदी करून सर्वाच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.


ताज्या बातम्या