Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शिर्डी-इंदौर बसमध्ये एका महिलेची माळ चोरीला; महिलेच्या तक्रारी वरून बस मालेगाव शहर पोलीस स्थानकात...

दि . 22/04/2019

शिर्डी ते इंदौर बस मध्ये एका महिलेची माळ चोरीला.
महिलेच्या तक्रारी वरून बस मालेगाव शहर पोलीस स्थानकात.
-सर्व महिला आणि पुरुष प्रवाश्यांची पोलिसांनी घेतली झडती...


मालेगाव शहरातील नवीन बस स्थानकात जागा आरक्षित करण्यासाठी शिर्डी ते इंदूर बस लागली यामध्ये लागलेल्या बस मध्ये जागा आरक्षित( एम एच- 14 बी.टी. 42 74) टाकलेल्या बॅगमध्ये मंगला बोरसे- राहणार बहादुरपुर, पारोळा, जिल्हा-जळगाव या  महिलेची सुमारे ७५ हजार रुपये किमतीची पावणेचार तोळ्याची सोन्याची माळ चोरीला गेली. दुपारी हा प्रकार घडला.बसस्थानक पासून शिवाजी पुतळापर्यंत पोहोचले चोरीला गेलेल्या प्रकार लक्षात येताच संबंधित महिलेच्या तक्रारीवरून बस शहरपोलीस ठाण्यात  नेण्यात आली.सर्व प्रवाशांची झडती घेण्यात आली मात्र माळ मिळून आली नाही.तब्बल एक तासाहून जास्त काळ हे नाट्य बघावयास मिळाले.त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले होते. यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


ताज्या बातम्या