Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
ईस्टर संडेच्या दिवशीच श्रीलंकेमध्ये सहा साखळी बॉम्बस्फोट, १६० जखमी तर ८० मृत

दि . 21/04/2019

ईस्टर संडेच्या दिवशीच श्रीलंका बॉम्बस्फोटाने हादरले आहे. श्रीलंकेच्या राजधानी कोलंबो येथे सहा साखळी बॉम्बस्फोट झाले आहेत. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत ८०हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावलेे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर १६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर हे बॉम्बस्फोट चर्च आणि हॉटेल मध्ये झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणत जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी त्वरितच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

जगभरात आज ईस्टर संडे मोठ्या उत्साहाने साजरा होत असतानाचं श्रीलंका हे साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे.

कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाले आहेत. रविवारी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे.

Embedded videoईस्टर संडे असल्यामुळे अनेक नागरिक हे चर्च मध्ये आले होते. नेमके त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. परिणामी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत १६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.


ताज्या बातम्या