Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पसायदान प्रतिष्ठान हे व्यक्तिविकासातून राष्ट्रविकासाचे व्रत- डॉ. दिनेश शिरुडे

दि . 21/04/2019

■ झोडगे (प्रतिनिधी) व्यक्ती विकासातूनच राष्ट्राचा विकास घडत असतो. म्हणून बालपणीच विद्यार्थी संवेदनशील माणूस, रसिक, जिज्ञासू, सेवाभावी झाले पाहिजे. माणसाच्या मनावरचा गंज जोवर निघत नाही तोवर व्यक्ती चांगला माणूस, चांगला रसिक होत नाही. मोबाईल सारख्या माध्यमातून आपण आपल्या माणसांपासून विस्थापित होत आहे. चिन्हांच्या भाषेत बोलता बोलता माणूस रुक्ष होत आहे. पसायदान प्रतिष्ठान हे व्यक्तिविकासातून राष्ट्रविकासाचे व्रत घेतलेले शिबिर आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दिनेश शिरुडे यांनी व्यक्त केले. संदीप सुधाकर सोनजे महाविद्यालय झोडगे येथे पसायदान प्रतिष्ठान कंधाने आयोजित अध्यात्मिक व्यक्तिमत्व विकास शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

 

■ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर सोनजे, उद्घाटक प्राचार्य डॉ. दिनेश शिरुडे हे होते.   शिबिराचे प्रास्ताविक आयोजक ह.भ.प. प्रकाश महाराज गांगुर्डे यांनी केले. जितुभाई कुटमुटीया, किशोर जाधव, शिल्पाताई देशमुख, नामदेव महाराज यांनी याप्रसंगी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. 

 

■ गेल्या अकरा वर्षांपासून पसायदान प्रतिष्ठान कंधाने तर्फे अकरा शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. उन्हाळी सुटीचा सदुपयोग व्हावा, मुलांचा सृजनात्मक विकास व्हावा, मुले देशाचे जबाबदार नागरिक व्हावेत म्हणून सदर शिबिराचे आयोजन केले जाते.या वर्षीही उत्तमोत्तम व्याख्याने, यशोगाथा शिबिरार्थीना ऐकायला मिळणार आहेत.

 

 ■ व्यासपीठावर जेष्ठ कृषीतज्ञ जीतूभाई कुटमुटीया त्रिशक्ती महाराज, गाळणे, सौ. छाया शिवाजी शिंदे सरपंच झोडगे, किशोर त्र्यंबक देसाई उपसरपंच   शिल्पाताई देशमुख, शैलेंद्र सोनजे, , राजेंद्र दिघे, अंकुश महाराज देवरे,, नामदेव महाराज भोगीर, शिल्पा देशमुख, , निवृत्ती महाराज सूर्यवंशी,  चेतनभाई कुटमुटीया, गोकुळ शिनकर, किशोर जाधव, मुकुंद थोरात, रवी सूर्यवंशी, सौ. वैशाली देसले, निंबा पवार, य सोपान गावडे, धर्मराज पवार, एकनाथ पवार आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर जाधव व सचिन महाराज देवरे यांनी केले.


ताज्या बातम्या