Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सर्वत्र लाव रे तो व्हिडीओ..चीच चर्चा..

दि . 20/04/2019

लोकसभा निवडणूक 2014 मध्ये मोदींनी इलेक्ट्रॉनिक यंत्रणांचा प्रभावीपणे वापर केला. तर आता 2019 मध्ये राज ठाकरे यांचे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आधारे मोदींच्या विरोधात प्रचार करत आहे.सध्या तर राज ठाकरे यांचा एकच शब्द सगळीकडे व्हायरल होत आहे तो म्हणजे ये लाव रे व्हिडिओ.


मोदींच्या मै भी चौकीदार या शब्दाला लाव रे तो व्हिडिओ या शब्दाने कधीच मागे टाकले आहे. असे नेटकरी च्या संशोधनामध्ये दिसून येत आहे.


लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections2019) पार्श्वभूमीवर देशभरात सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहेत.मात्र यंदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष उमेदवारीने सहभागी नसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) मात्र वेगळ्याच कारणावरून चर्चेत आहेत. आपल्या तडफदार भाषण शैलीने महाराष्ट्र्रातील जनतेच्या मनात स्थान निर्माण केलेल्या राज ठाकरेंनी ठिकठिकाणी सभा घेत भाजपा व पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रचार करण्याचा पवित्रा स्वीकारला आहे. या निम्मिताने सध्या कार्यरत असणाऱ्या सरकारवर आपल्या शब्दांची अस्त्रे सोडताना राज यांनी या राजकारण्यांच्या भाषणातील व्हिडियोंचे पुरावे ही दिले आहेत.

राज यांच्या सभांमध्ये हे व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवायला सांगताना राज ठाकरे कार्यकर्त्यांना 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणताना दिसतात. नेटकऱ्यांनी आता याच 'लाव रे तो व्हिडिओ वाक्याचा आधार घेत सोशल मीडियावर मिम्स व्हायरल करायला सुरवात केलीय.

सध्या राज्यभरात राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडीओ या वाक्याचे बारामतीमध्ये तयार होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज ठाकरे एखाद्या नेत्याला पाठिंबा देत नसले तरी त्यांच्या भाषणांचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.  राज ठाकरे प्रमाणे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणारा विरोधकांमध्ये एकही नेता नसावा का हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे 


ताज्या बातम्या