Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील जामिनावर असलेल्या साध्वी प्रज्ञा सिह यांच्या उमेदवारी विरोधात ब्लास्ट पीडितांचे कुटूंबीय न्यायालयात; मुस्लिम संघटनांमध्ये तीव्र नाराजी ..

दि . 19/04/2019

मालेगाव २००८ स्पोट मधील आरोपी प्रज्ञा सिंग ठाकूर हिच्या जामीनविरोधात  स्फोटातील पीडितांच्या वतीने अर्ज. साध्वीने आजारपणाच्या सबबीवर जामीन मिळवला,आजारी असताना निवडणूक कशी लढवू  शकता हा प्रश्न ?

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. प्रज्ञासिंह या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीपैंकी एक आहेत. हे माहित असूनही भाजपने साध्वींना भोपाळ लोकसभेची उमेदवारी कशी जाहीर केली. असा सवाल गेल्या अकरा वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पीड़ित कुटुंबियांच्या  सदस्यांनी केला आहे. या संदर्भात निसार अहेमद सय्यद बिलाल यांनी कोर्टात याचिका दाखल करत त्यांच्या पाठीमागे मुस्लिम संघटना उभ्या असल्याचे डॉ.अकलाख यांनी सांगितले.   

याचिकाकर्ता निसार अहेमद सय्यद बिलाल म्हणाले, प्रज्ञासिंह यांच्यावरील मकोका कायद्याअंतर्गत झालेली कारवाई न्यायालयाने बरखास्त केली असली तरी अन्य दहशतवादविरोधी कायद्यांखाली त्यांच्यावर कारवाई चालूच आहे. मा.न्यायालयाने साध्वीला अजूनही निर्धोष  मुक्त केलेले नाही आणि कर्करोगावर आयुर्वेद उपचार घेता यावे म्हणून उपचारासाठी कोर्टातून सुटका देण्यात आली आहे. अजून तिला निर्दोष सोडलेल नाही. आणि त्याआधी जर भाजपा सारखा पक्ष जर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तिला उमेदवारी देत असेल तर हि गंभीर बाब आहे. या विषयी मुस्लिम संघटनानाही नाराजी व्यक्त केली अजून जर भाजपाने त्याचा विचार नाही केला तर संघटना भोपाळ मध्ये जाऊन आंदोलन अथवा विरोधात काम करणार असल्याचे काही मुस्लिम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. भाजपने प्रज्ञासिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन स्वतः मात्र राष्ट्रीय सुरक्षेची हेळसांड केली आहे. 


काय आहे मालेगाव स्फोट प्रकरण -

मालेगावातील भिकू चौकालगत २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ७ लोकांचा मृत्यू तर ९२ लोक जखमी झाले होते. याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) २३ ऑक्टोबर २००८ रोजी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह कर्नल पुरोहित , राकेश धावडे, अजय उर्फ राजा राहिरकर आणि जगदीश म्हात्रे यांना आरोपी म्हणून दहशतवाद विरोधी पथकाने नाशिक कोर्टात हजर केले होते. प्रदीर्घ न्यायालयीन खटल्यानंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय आणि अजय राहिरकर यांच्यावरील मकोका हटवला होता.


ताज्या बातम्या